भारत-चीन सैन्यात चर्चेची १३ वी फेरी सुरू

Read Time:1 Minute, 36 Second

नवी दिल्ली : गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन दरम्यानचे संबंध आणखी ताणले गेले. यानंतर मागील दोन महिन्यांपासून चीनने पुन्हा सीमेवर कारवाया करायला सुरुवात केल्याने सीमावर्ती भागात तणाव वाढला आहे. यासाठी भारत आणि चीन यांच्यातील चर्चेच्या १३ व्या फेरीला सुरुवात झाली आहे.

कॉर्प्स कमांडर पातळीवर पार पडणारी ही फेरी मोल्डो येथे चीनच्या बाजूने सुरू आहे. हॉट स्प्रिंग्स भआगातील पॅट्रोंिलग पॉईंट (पीपी) १५ पासून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेतील तिसरा टप्पा पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचसोबत एकूणच डी-एस्केलेशनचा भाग म्हणून पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मोल्डो येथे सकाळी १०.३० च्या सुमारास ही चर्चा सुरू झाली, अशी माहिती संरक्षण अधिका-याने दिली. भारतीय बाजूचे सैन्याच्या लेह स्थित १४ कोर कमांडर लेफ्टनंट जनरल पी.जी.के. मेनन हे नेतृत्व करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 + sixteen =