भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण च्या वतीने ज्ञानसूर्य माता भीमाई रामजी आंबेडकर यांची जयंती साजरी!

Read Time:1 Minute, 42 Second

नांदेड दिनांक १४- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री ज्ञानसूर्य माता भीमाई रामजी आंबेडकर यांची जयंती भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण च्या वतीने साजरी करण्यात आली.

तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून माता भिमाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणचे अध्यक्ष पीएम वाघमारे दरबारे गुरुजी सुनील गोधने यांनी प्रथमतः  महामानवनां व  माता भिमाई यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले तद्नंतर  बुद्ध वंदना पूजापाठ घेण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पि एम वाघमारे यांनी समयोचित विचार मांडले यावेळी दीनबंधु अर्जुनराव चौदंते राजू वाघमारे चोपडे टेलर साळवे साहेब व अन्य धम्माचे प्रेमी नागरिक उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण च्या सिडको येथील जिल्हा कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरसिंगराव दरबारे गुरुजी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 + fifteen =