January 21, 2022

भारतीय उपखंडात युद्ध अटळ?

Read Time:2 Minute, 52 Second

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून भारतीय उपखंडातील शेजारी प्रांत तैवानवरून वातावरण तापू लागले आहे. चीनने सातत्याने तैवानवर आपला हक्क सांगितला आहे. गेल्या महिन्याभरात तर चीनने तैवानबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तैवानकडूनदेखील चीनच्या आक्रमणाची शक्यता आणि भीती वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तैवानला जागतिक स्तरावर चीनविरोधात वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. एकीकडे अमेरिका आणि युरोपियन युनियनने युद्ध झाल्यास चीनच्या विरोधात तैवानच्या बाजूने उतरणार असल्याचे जाहीर केले. आता त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भारतीय उपखंडात युद्ध अटळ मानले जात आहे.

तैवानची स्वायत्तता धोक्यात येऊ नये, यासाठी भारतासह जागतिक स्तरावर अनेक देश प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात चीनला जागतिक पातळीवरून अनेकदा इशारेदेखील देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील चीनने आपली भूमिका कायम ठेवल्यामुळे आता तैवानला पाठिंबा वाढू लागला आहे. अमेरिका, युरोप आणि आता ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य देश तैवानच्या बाजूने आल्यामुळे आता चीनकडूनदेखील मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे सोमवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी भारतासोबतचा तणाव यासह तैवानच्या मुद्यावरून चर्चा करणार आहेत. बायडन यांनी अगोदरच आपण बीजिंगच्या कार्यावर नजर ठेवून आहोत, असे म्हटले आहे. उत्तर-पश्चिमी चीनमध्ये अल्पसंख्याकांविरोधात मानवाधिकाराचे उल्लंघन, समुद्री मुद्दा, तैवान, दक्षिण चीन सागरसंबंधी मुद्यावरून अमेरिकेने चीनवर टीका केली आहे. त्यामुळे या मुद्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. तसेच तैवानचा मुद्दा अधिक चर्चिला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 2 =

Close