भारतासाठी सात कोटीच्या साहित्याचा पुरवठा

अमेरिकेतील ह्यूस्टन येथील अनिवासी भारतीय डॉक्टरांनी भारताला कोविडच्या परिस्थितीत मदतीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नाला मोठे यश आले असून ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पीटलने तब ७ कोटी रुपयांचे आरोग्य विषयक साहित्य पाठविले आहे. अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन येथील अनिवासी भारतीय डॉक्टरांनी भारतात गरजू रुग्णांना मदत पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तेथील इंडियन डॉक्टर असोसिएशनचे डॉ. जिग्नेश शहा, डॉ. स्वाती जोगळेकर, डॉ. आरुषा बवरे, डॉ. संगीता साकीया यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.

तेथील अनिवासी भारतीयांना मदतीचे आवाहन केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम जमा झाली या रकमेतून महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात या राज्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रवाना करण्यात आली आहे केले. भारतातील स्थानिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तसेच परिचित वैद्यकीय व्यावसायिकांच्या माध्यमातून गरजूंना हे साहित्य पुरवठा केली जात आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः वैद्यकीय सेवा देणाऱ्या ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पीटल प्रशासनाला मदतीबाबत विचारणा केली. त्यानंतर हॉस्पीटल प्रशासनाने मदतीसाठी होकार दर्शविला.

त्यातून हॉस्पीटल मध्ये असलेले पीपीई कीट, डिस्पोसेबल गाऊन, एन ९५ मास्क, शु कव्हर, आदी सुमारे ७ कोटी रुपये किमतीचे आरोग्य सेवेसाठी लागणारे साहित्य दिली आहे. सुमारे १४ हजार किलो वजनाचे हे साहित्य गुरुवारी ता. २० भारताकडे पाठविण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हे साहित्य भारतात पोहचणार असल्याचे डॉ. अरुषा बवरे यांनी सांगितले. मुंंबई येथे विमानतळावर आलेले हे साहित्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडे पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्मभूमीतून मायभूमीला केलेली मदत समाधान देणारी : डॉ. अरुषा बवरे
भारत ही आमची माय भूमी तर सध्या अमेरिका ही कर्मभूमी आहे. कोविडच्या परिस्थितीत कर्मभूमी तून मायभूमीला केली जाणाऱ्या मदतीमुळे इंडियन डॉक्टर असोसिएशन समाधानी आहे. महाराष्ट्र व गुजरात साठी प्रत्येकी पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही पाठवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − five =

vip porn full hard cum old indain sex hot