भारताने परदेशी बँकांकडे मागितली १५ हजार कोटींची मदत

Read Time:1 Minute, 48 Second

नवी दिल्ली : े कोरोना महामारीने जगभरात थैमान घातल्यानंतर देशात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. अलिकडेच केंद्र सरकारने देशात १०० कोटी लसीकरण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने आशियाई विकास बँक आणि आशियन पायाभूत गुंतवणूक बॅकेंकडून १५ हजार कोटी कर्ज मागितले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.

भारतातल्या २६ टक्के लोकांना लसीकरणाचा पहिला डोस तर ७६ टक्के लोकांना लसीकरणाचा दुसरा डोस अद्यापही मिळाला नाही. त्यासाठी केंद्र सरकारने लसींच्या ६७.७ कोटी डोस खरेदी करण्यासाठी फिलिपिन्सच्या आशियाई विकास बँककडून आणि बिजिंगमधील आशियन पायाभूत गुंतवणूक बँककडे १५ हजार कोटी रूपयांचे कर्ज मागितले असल्याचे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले आहे.

कर्ज प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन यामधून जवळपास ३१.७ कोटी जनतेचं लसीकरण पुर्ण करता येईल असे सांगण्यात येत आहे. तर इंधनावर लावलेला कोविड टॅक्स आणि पीएम केअर निधीचे काय झाले आहे? असा सवालही मल्लिकार्जून खर्गे यांनी केंंद्र सरकारला केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × two =