January 21, 2022

भारतात प्रवेशासाठी ‘आरटी-पीसीआर’ आवश्यक

Read Time:1 Minute, 50 Second

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे थैमान अद्यापही कमी झालेले नाही. भारतात ब-यापैकी कोरोना नियंत्रणात आला आहे. तरी मोदी सरकारने सावध भूमिका घेतली आहे. आता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला आहे.

भारतात येणा-या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच भारतात एंट्री मिळणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रायलायने भारतात येणा-या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

त्यानुसार भारतात येण्यासाठी प्रवाशांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. तरच भारतात प्रवेश दिला जाणार आहे, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे आरटी-पीसीआर टेस्टमधून कळते. सध्या हीच टेस्ट सर्वत्र केली जाते आहे. यामध्ये संक्रमित व्यक्तीचे नाक किंवा घशातील स्वॅबचे नमुने घेतले जातात.

हे नमुने आणि व्हायरसच्या डीएनएची तुलना केली जाते. दोघांमध्येही समानता असेल तर त्या व्यक्तीला कोरोना आहे, असे निदान केले जाते. या तपासणीला चार ते सहा तासांचा अवधी लागू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + fourteen =

Close