भारताच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश

Read Time:1 Minute, 58 Second

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने संघाने दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली आहे.

भारतीय महिला संघाने ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच केला आहे. गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर या सामन्यात हा ऐतिहासिक विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये २२ व्या मिनिटाला गुरजीतने एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात भारतीय महिला यशस्वी ठरल्या.

सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघामध्ये चुरशीचा आणि अटीतटीचा खेळ दिसून येत होता. दोन्ही संघ गोल करण्याचे प्रयत्न करत होते पण यश कोणालाच येत नव्हतं. भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या भारदस्त संरक्षण आणि आक्रमक प्रदर्शन या सामन्यात दाखवलं. ज्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताच्या गुरजीतने सामन्यातील एकमेव गोल केला आणि १-० ची आघाडी घेतली. दुसरीकडे गोलकीपर सविताने भिंत बनून ऑस्ट्रेलियाचे हल्ले परतवून लावले. ज्यामुळे सामन्यात भारत १-० ने विजयी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen + fifteen =