भाजपा हिशोब करतेच-गणेश हाके – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा हिशोब करतेच त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते इतरांच्या पोस्ट व्हायरल करीत असतील तर त्यांचाही हिशोब होईलच अशा शब्दात आजच्या पत्रकार परिषदेत भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके यांनी उत्तर दिले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर बोलण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गणेश हाके, उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, देविदास राठोड, धम्मपाल धुताडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना गणेश हाके म्हणाले की, आमचे कार्यकर्ते इतरांचे पोस्ट सार्वजनिक संकेतस्थळावर व्हायरल करत असतील तर त्यांचा हिशोब होईलच. कारण भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा हिशोब करत असते. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी देशात 400 पेक्षा जास्त जागा मिळवेल असा विश्र्वास व्यक्त केला. आजपासून बुथ सक्षमीकरण कार्यक्रम पुढील सहा दिवस सुरू राहिल. त्यामध्ये छोटे-छोटे मेळावे, दलित, आदीवासी, ओबीसी आदी लोकांची भेट घेतली जाईल. युवा आणि महिलांची भेट घेतली जाईल आणि त्यातून प्रत्येक मतदान केंद्रावर 370 पेक्षा जास्त मताधिक्य मिळावे यासाठी काम केले जाणार आहे. विधानसभा निहाय सुध्दा मतदान केंद्रांचे सर्व्हेक्षण होणार आहे. बुथ संकल्पना राबविल्यामुळेच 2014 मध्ये 282 खासदार निवडूण आले. यंदा प्रत्येक बुथवर 51 टक्के मतदान भारतीय जनता पार्टीला मिळेल यासाठी काम करणार आहोत असे सांगितले.
उद्या सकाळी 9.30 वाजता नवा मोंढा मैदानातून रॅलीच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी जाऊ असे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर यांनी कालच आपला उमेदवारी भरल्याची माहिती दिलेली आहे. उद्या भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस, खा.अशोक चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे आदी सुध्दा माझा अर्ज भरण्यासाठी रॅलीत सहभागी होती अशी माहिती प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.


Post Views: 50


Share this article:
Previous Post: अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी

April 2, 2024 - In Uncategorized

Next Post: राजकीय पक्ष निवडणुकीत जातीचे समीकरण वापरतात तर नांदेड जिल्हा पत्रकारांमध्ये सुध्दा “एम’ फॅक्टरवर काम करण्याची चिंदीगिरी

April 3, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.