January 21, 2022

भाजपाचे पेट्रोल, डिझेलवरील कर कपातीसाठी आंदोलन

Read Time:3 Minute, 17 Second

परभणी/प्रतिनिधी
केंद्र सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी आज परभणी भाजपा महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल सहा व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले असल्याचे म्हटले आहे. राज्यात डिझेलवर २४ टक्के आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात. महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी. तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणा-या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मोहन कुलकर्णी, कमलकिशोर अग्रवाल, संजय रिझवानी, दिनेश नरवाडकर, अनुप शिरडकर, सुनिल देशमुख, भीमराव वायवळ, विजय गायकवाड, संजय कुलकर्णी, विलास चांदवडकर, अ‍ॅडग़णेश जाधव, संतोष जाधव, संजय शामरथी, सौ.शंकुतला मठपती, प्रदिप तांदळे, भालचंद्र गोरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.सुप्रिया कुलकर्णी, सौ.विजया कातकडे, डॉ.मनोज पोरवाल, उमेश शेळके, रामदास पवार, सौ.गीता सूर्यवंशी, संजय जोशी, सिंकदर खान, गणेश देशमुख पेडगावकर, सौ.प्रिया पेदापल्ली, सौ.अर्चना कदम, सौ.शोभा साना, दिपक शिंदे, नीरज बुचाले, माऊली कोपरे, अंकुश जोगदंड, मो.गौस भाई आदी भाजपा पदाधिका-यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 3 =

Close