January 21, 2022

भाजपसाठी ख-या अर्थाने फटाकेमुक्त दिवाळी

Read Time:1 Minute, 34 Second

देशभरातील तीन लोकसभा तसेच २९ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरू आहे. १३ राज्यांमध्ये या पोटनिवडणुकांसाठी ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. पश्चिम बंगालमध्ये चार मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिनहाटा, सांतीपूर, खारदाह आणि गोसाबा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसने जिंकले आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

तृणमूलने पोटनिवडणूक जिंकल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करत भाजपाला टोला लगावला. भाजपासाठी ख-या अर्थाने फटाकेमुक्त दिवाळी. भाजपाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, असे अभिषेक बॅनर्जींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दिनहाटा, सांतीपूर, खारदाह आणि गोसाबा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमदेवार विजयी झाले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर पोटनिवडणुकीत टीएमसीच्या उमेदवारांच्या कामगिरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − five =

Close