भरधाव ट्रकने 9 दुचाकींना धडक दिली; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी


नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर एका ट्रकने बारड चौकात नऊ दुचाकींना धडक दिली. त्यात एका व्यक्तीच्या कपाळाला मार लागून तो जागीच मरण पावला आहे आणि इतर काही जण जखमी आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर बारड चौक येथे अतिवेगात जात असणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.34 बी.जी.7823 च्या चालकाने पाच दुचाकी गाड्यांना धडक दिली. त्यात गोविंद रामजी कोडेवाड (40) रा.रायपुर तांडा ता.किनवट याच्या कपाळाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच सुनिल राठोड यांच्या डोक्याला, पायाला हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा घटना क्रमांक 30 एप्रिलच्या सकाळी 8 वाजता घडला. ट्रकने धडक दिलेल्या दुचाकींचे क्रमांक एम.एच.26 ए.झेड. 5014, एम.एच.26 ए.यु.8954, एम.एच.26 बी.टी.2449, एम.एच.26 यु.0327 आणि एम.एच.26 बी.एफ.3704 आणि इतर चार दुचाकी गाड्या आहेत.
घटना घडली त्या ठिकाणी वाहतुक चिन्ह नाहीत, वाहनांचा वेग किती मर्यादेत पाहिजे याची चिन्हे नाहीत आणि रस्त्यावर गतीरोधक नाहीत. त्यामुळे सुध्दा हा घटनाक्रम घडला आहे. घटना घडताच बारड वाहतुक मदत केंद्रातील पोलीस उपनिरिक्षक हनुमंत कवळे, राजेश लयगुलवार, पोलीस अंमलदार अब्दुल गणी, शेख ऊजेर, गणपत शेवाळकर, सुधाकर रणविरकर, संतोष निलेवार, संतोष वागतकर, अमोल सातारे, गुरूप्रितसिंघ मान, बालाजी ठाकूर, नितीन भुताळे, परमेश्र्वर श्रीमंगले, बालाजी हिंगनकर आणि ज्ञानेश्र्वर आवातिरक हे घटनास्थळी पोहचले आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.


Post Views: 10


Share this article:
Previous Post: जिल्हा आरोग्य अधिकारी – VastavNEWSLive.com

April 29, 2024 - In Uncategorized

Next Post: पोलीस अधिक्षक कार्यालयात संत तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा

April 30, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.