भगतसिंह कोश्यारींच्या हाकलपट्टीमागं भाजपचाच हात?

Advertisements
Advertisements
Read Time:5 Minute, 51 Second


मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले तेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी(Bhagat Singh Koshyari) राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असे पहिले राज्यपाल आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाता राज्यपालांच्या खुर्चीवर असताना वारंवार वादग्रस्त भूमिका घेतल्या किंवा वादग्रस्त वक्तव्यं केली. आपल्या वादग्रस्त कारकिर्दीमुळं सध्या राज्यपालांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानं ते सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या राज्यपालांच्या आतापर्यंतच्या वादग्रस्त भूमिका काय आणि त्यांनी स्वत: राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे की हा भाजपचााच डाव आहे राज्यपालांची हाकलपट्टी करण्याचा हेच आपण जाणून घेऊयात.

Advertisements

५ सप्टेंबर २०१९ रोजी भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीला सुरूवात झाली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपासून. त्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रीमंडळाच्या वेळी नियमबाह्य शपथ घेतली म्हणून कोश्यारींनी मंत्र्यांना सुनावलं होतं. त्यांनतर पुन्हा महाविकासआघाडीनं पाठवलेल्या 12 राज्यपालनियुक्त यादीला कोश्यारींनी मान्यता दिली नव्हती. आणि ही १२ पदे अजूनही रिक्त आहेत. या झाल्या कोश्यारींची वादग्रस्त भूमिका आता आपण कोश्यारींची वादग्रस्त वक्तवे जाणून घेऊयात

कोश्यारींची पाच वादग्रस्त वक्तव्ये.

  1. मुंबईतून राजस्थानी-गुजराती माणसाला बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही.
  2. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल.
  3. जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईं यांचं लग्न झालं तेव्हा त्यांचं वय १३ आणि १० होतं. या वयात मुलगा-मुलगी काय करताता.
  4. नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे त्यामुळं देश कमकुवत झाला आणि बराच काळ कमकुव राहीला.
  5. आत्ताचं ताज वादग्रस्त वक्तव्य म्हणजे शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत.

ही झाली त्यांची वादग्रस्त वक्तव्ये पण महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजप नेते किंवा विविध क्षेत्रातील लोक आपल्या कामांसाठी सरकामधील मंत्र्यांची भेट न घेता थेट राजभवन गाठत राज्यपालांची भेट घ्यायचे. त्याकाळात नवनीत राणांपासून ते कंगनापर्यंत अनेक जणांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळं राजभनव हे समांत्तर केंद्र बनत आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कारण राज्यपाल हे नाममात्र पद आहे. आणि सरकारमधील सदस्य हे जनेतेने निवडूण दिलेले प्रतिनिधी असतात.

कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळ आणि कृतीमुळं बऱ्याचदा राजकीय वातावरण चांगलंच तापलं गेलं होतं. त्यामुळं राज्यपालांची हाकल्लपट्टी करावी, अशी मागणी बऱ्याचदा करण्यात आली होती. आता नुकतीच राज्यपालांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केलीय. तोही अजून त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायला एक वर्षाहून अधिक काळ बाकी असताना.

कदाचित राज्यपालांच्या या वागणुकीमुळं भाजपची डाकेदुखी वाढत असावी. राज्यपाल आपल्या अंगलट येतील अस आता भाजपला वाटत असावं. त्यामुळं राज्यपालांच्या या वागणुकीचा परिणाम भाजपला निवडणुकीच्यावेळी भोगावा लागू शकतो. म्हणूनच भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी प्लॅन करून राज्यपालांची हकलपट्टी करण्याचा निर्णय घेतला असावा. आता सगळ्यांना कशाला दाखवायचं हाकलपट्टी केली यासाठी भाजपनंच कोश्यारींना राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करायला लावली असावी, ही एक प्रकारची भाजपची खेळी आहे. आता अशा आशयाच्या चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. तुम्हाला काय वाटतं राज्यपालांना पदमुक्त करणं हा भाजपच्या वरिष्ट नेत्यांचाचा प्लॅन आहे का ? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *