January 21, 2022

ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ७८ हजार रुग्णांची नोंद

Read Time:2 Minute, 54 Second

लंडन : ब्रिटनमध्ये बुधवारी कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशातल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद काल ब्रिटनमध्ये झाली. काल एकाच दिवसात ब्रिटनमध्ये ७८ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली. या आधीचा उच्चांक जानेवारीमध्ये नोंदवण्यात आला, जेव्हा एकाच दिवसात १० हजार रुग्णांची नोंद झाली होती. पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते, असे एका वरिष्ठ ब्रिटीश आरोग्य प्रमुखाने सांगितले.

सुमारे ६७ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये आता ११ दशलक्षाहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणाची लाट आल्याचा इशारा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे. तथापि, मंगळवारी जेव्हा १०० हून अधिक खासदारांनी या रोगाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या विरोधात मतदान केले तेव्हा त्यांना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातल्या सर्वात मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागल्याने त्यांच्या अधिकाराला धक्का बसला.

जागतिक आरोग्य धोक्यात
ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेचे मुख्य कार्यकारी जेनी हॅरी यांनी यापूर्वी ओमिक्रॉन प्रकाराला साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा सर्वाधिक धोकादायक म्हटले आहे. पुढील काही दिवसात जे आकडे आम्ही मागील प्रकारांच्या रुग्णांमध्ये पाहिले आहेत. त्या वाढीच्या दराच्या तुलनेत आताची रुग्णसंख्या खूपच आश्चर्यकारकरित्या वाढली आहे, असे त्यांनी संसदीय समितीला सांगितले. हॅरी म्हणाल्या की ज्या वेगाने ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत आहे, त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य गंभीर धोक्यात आहे. दुपटीने वाढ होत आहे, विशेषत: लंडन आणि मँचेस्टरमध्ये त्याचा वाढीचा दर लक्षणीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 1 =

Close