August 19, 2022

बौद्ध धम्म हा माणुसकीची शिकवण देणारा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर यांचे प्रतिपादन

Read Time:2 Minute, 57 Second

नांदेड – मानव समाजाला दुःख मुक्ती तून सोडविण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग म्हणजे बुद्ध धम्म असून बुद्धधम्माचे तत्त्वांचा अंगीकार केल्यास मानवाला सुखाची निश्चित प्राप्ती होते असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना केले.

शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळे समोर बुद्ध जयंती निमित्त वैशाख पौर्णिमा दि.१६ सोमवारी एकनिष्ठ प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने बुद्ध प्रभात या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे सहा वाजल्यापासून या संगीत कार्यक्रमास प्रतिज्ञा संगीतकार व कलावंत अंकुश चित्ते व संच यांनी बुद्ध पौर्णिमेची पहाट आपल्या सांगीतिक गायनाने मंगलमय केली होती या कार्यक्रमास शहरातील विविध मान्यवरांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांनी भेट देऊन तमाम बौद्ध जनतेस शुभेच्छा दिल्या. एकनिष्ठ प्रतिष्ठानच्यावतीने संयोजकांनी त्यांचा पंचरंगी शेला व पुष्पहार स्मृतिचिन्ह देत सत्कार केला त्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.

आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व रवी भोकरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटनही सौ ठाकूर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. बुद्ध प्रभात कार्यक्रम गेल्या वीस वर्षापासून सातत्याने आयोजित केला जात असून कोविड कालखंडानंतर या पहिल्या कार्यक्रमाला श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी सौ ठाकूर मॅडम यांच्या कार्यकर्तृत्व आणि सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल कार्यक्रमाच्या संयोजकांनी गौरवोद्गार काढून त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − 13 =

Close