बोधडी येथील हॉटेलमधील आचाऱ्याने महिलेचा खून केला


नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी येथे हॉटेलमधील एका आचाऱ्याने एका महिलेचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
चंद्रकांत उमेश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जूनच्या सायंकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान त्यांच्या घरी किरायाणे राहणारे कैलास डांबर यांनी आपली दुसरी पत्नी अर्चना कैलास डांबर (35) यांना किरकोळ कारणाच्या भांडणावरून बाजेचा माचवा उचलून तिच्या डोक्यात टाकला आणि तिचा खून केला. किनवट पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 152/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक दिनेश येवले अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणातील मारेकरी कैलास हा मुळ राजस्थान येथील रहिवासी आहे आणि बोधडीमध्ये आचारी म्हणून कार्यरत होता.


Post Views: 255






Share this article:
Previous Post: महानगरपालिकेच्या अदभुत अतिक्रमण हटाव मोहीमें मुळे नांदेड शहरातील अतिक्रमण संपुष्टात येईल का

June 12, 2024 - In Uncategorized

Next Post: नखेगाव शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी महिलेचा खूनच; महिला गर्भवती होती

June 12, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.