June 29, 2022

बेडसाठी आंदोलन करणा-या रुग्णाचा तडफडून मृत्यू

Read Time:1 Minute, 36 Second

कोरोना संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. नाशिकमध्ये उपचाराअभावी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग बेफाम वेगाने वाढत आहे. भाऊसाहेब काळे या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते.

कोरोनाची लागण झाल्यानंतर शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांनी कुटुंबासह संध्याकाळी नाशिक महापालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. ऑक्सिजन लेव्हल ३६ असूनही ते बेडसाठी शहरभर फिरले होते. अखेर ऑक्सिजन लावूनच त्यांनी मनपाचे कार्यालय गाठले़ त्यानंतर मनपाने त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले़

मात्र तिथेही त्यांना व्हेंटिलेटर मिळू शकले नाही. आणि गुरुवारी अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यात कोरोना रुग्णांची किती फरफट होत आहे हे लक्षात येत आहे़.

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + six =

Close