July 1, 2022

बुलडाण्यात स्टेट बँकेवर मोठा दरोडा

Read Time:2 Minute, 12 Second

बुलडाणा : जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील केळवद येथील स्टेट बँकेच्या शाखेवर २० लाखाचा दरोडा पडल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेनऊच्या वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. सकाळी बँकेचा शिपाई बँक उघडण्यासाठी आला आला असता ही बाब लक्षात आली.

या घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना देण्यात आली.
घटनास्थळी वरिष्ट पोलीस अधिकारी व श्वान पथक दाखल झाले होते. रात्रीच्या दरम्यान खिडकीचे गज वाकवून चोरटे बँकेत शिरले. गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडली आणि त्या तिजोरीतून २० लाख ८१ हजार ५७५ रुपये चोरी करून पळ काढला. सकाळी शिपाई बँकेत आला, तेव्­हा खिडकीचे गज वाकवलेले गेल्याचे पाहून त्­याला चोरीचा संशय आला आणि त्­याने बँकेच्या अधिका-यांना ही माहिती दिली.

स्टेट बँकेची शाखा केळवदमध्ये किन्­होळा रोडवर आहे. अधिका-यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना कळवले. त्­यानंतर पोलीस घटनास्­थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्­थानिक गुन्­हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे हेही घटनास्­थळी आले आहेत. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.

श्वानाने बँकेच्­या बाजूच्­या शेतापर्यंत माग काढला. तिथे दरोडेखोरांचे हँडग्­लोज व बॅटरी मिळाली. सीसीटीव्­हीत दरोडेखोर कैद झाल्याची शक्­यता असून, सीसीटीव्­हीचे फूटेज तपासले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 + 2 =

Close