January 21, 2022

बुध्द विहार निर्मितीसाठी विस लाखांचा निधी मंजूर : आ.डॉ.पाटील

Read Time:2 Minute, 29 Second

परभणी : विश्र्व शांतीदूत तथागत गौतम बुध्द यांनी आपल्या निरंतर चिंतनातून विश्र्व कल्याणाचा धम्म दिला. त्याने प्रभावीत होवून अनेक राजे, महाराजे, सम्राट यांनी आपल्या राज्यात बुध्द विहारांची निर्मिती करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचेच प्रतिक म्हणून परभणी तालुक्यातील समसापूर येथे बुध्द विहार लवकरच निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी २० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.राहूल पाटील यांनी केले.

परभणी विधानसभा मतदार संघातील समसापूर येथे बुधवार, दि.०५ जानेवारी रोजी बौध्द पंच कमिटी व नवयूवक मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित बुध्द विहाराची पायाभरणी आ.डॉ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भदंत डॉ.उपगुप्त महास्थवीर, भदंत मुदीतानंद थेरो, भदंत प्रज्ञा बोधी, भदंत रोहन, शिवसेना दलित आघाडी तालुका प्रमुख सुभाष जोंधळे, राणुबाई वायवळ, अरविंद देशमुख, युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, अमोल गायकवाड, सरपंच बंडू राहूळ, उपसरपंच रमेश चोपडे, संदीप झाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले की, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी जागोजाग बुध्द विहारांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे आ.डॉ.पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी केरबा चोपडे, अनंता वायवळ, शेषराव लोणकर, सखाराम खिल्लारे, गोपीनाथराव झाडे आदिंनी प्रयत्न केले. यावेळी भिम शाहीर दयानंद वायवळ आणि संच यांचा भीम गितांचा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 14 =

Close