बुधवारी ९ अर्ज ; आतापर्यंत २० अर्ज दाखल – VastavNEWSLive.com


१४५ अर्जाची उचल ;आज शेवटची तारीख

नांदेड दि. ३ एप्रिल :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या गुरुवार चार एप्रिल शेवटचा दिवस आहे. आज बुधवारी एकूण ९ अर्ज दाखल झाले. १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

बुधवारी 16 नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी एकोणवीस अर्जाची उचल करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १४५ अर्ज उचलण्यात आले आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दाखल झालेले अर्ज लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष ), तुकाराम गणपत बिराजदार (अपक्ष ), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस ), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी ), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत,), मोहम्मद वसीम (अपक्ष ), मोहम्मद सिद्दीकी शेख संदलजी (अपक्ष ), भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष ), असलम इब्राहिम शेख (अपक्ष )

आतापर्यंत दाखल झालेले अर्ज चिखलीकर प्रतापराव गोविंदराव ( भारतीय जनता पार्टी ), विष्णू मारुती जाधव (राष्ट्रीय किसान पार्टी ), जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष ), कदम सुरज देवेंद्र (अपक्ष ) ,नागोराव दिगंबर वाघमारे (अपक्ष ), नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन (अपक्ष ), वसंतराव बळवंतराव चव्हाण(इंडियन नॅशनल काँग्रेस ), महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष ),अकबर अख्तर खॉन ( अपक्ष ),साहेबराव भिवा गजभारे( अपक्ष ), जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण (अपक्ष ) यांनी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्याचा एक दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.


Post Views: 83


Share this article:
Previous Post: नांदेडमध्ये 5 एप्रिलपासून प.पू. स्वामी श्री प्रिया शरणजी महाराज यांची श्रीराम कथा

April 3, 2024 - In Uncategorized

Next Post: अशोकाची पडझड आणि वसंतऋतूची बहर-अमित देशमुख – VastavNEWSLive.com

April 3, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.