बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान

Read Time:1 Minute, 24 Second

नविन नांदेड –  सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान वाटप करण्यात आले,या वेळी महिलासह युवक ,जेष्ठ नागरिक समाज बांधव यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

त्यावेळी उपस्थित आंबेडकर चळवळीतील युवा नेते राजू भाऊ लांडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप हणंवते, जयंती मंडळाच्या अध्यक्ष दीपक नरनवरे, उपाध्यक्ष विशाल गायकवाड,संतोष आढाव,आशिष हनवते,किरण सोनसळे,प्रकाश कांबळे,शुभम देवकांबळे,अभिजीत सोनसळे,स्वराज वाघमारे,रवि गवळे,विशाल होनवडजकर,चंद्रकांत डोम्पले,माधव गायकवाड,किरण डोम्पले ,नागसेन लोहकरे, सतीश गजभारे मंगेश चिखलीकर भूषण गरदनमारे व शाहूनगर भागातील बुद्ध उपासक-उपासिका बालक व बालिका,नवयुवक भीम जयंती मंडळ यांचाही रॅलीत सहभाग होता बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − 12 =