
बुद्ध जयंतीनिमित्त सुधाकर पांढरे मित्रमंडळाच्यावतीने खीर व अन्नदान कार्यक्रम
नांदेड /प्रतिनिधी:
सुधाकर पांढरे मित्रमंडळातर्फे राहुल वाघमारे व मित्र परिवार मागील अकरा वर्षापासून बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त खीर व अन्नदान कार्यक्रम घेतात. त्याचप्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अन्नदान व खीर दान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंतीज्योती घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार्या माता भगीनी व सर्व उपासकांसाठी खीर व अन्नदानाचा कार्यक्रम नांदेड नगरीचे प्रथम महापौर सुधाकरभाऊ पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतात. यावही वर्षी बुद्ध जयंती महोत्सावानिमित्त दि. 16 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा, नांदेड येथे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे हे राहणार असून स्वाताध्यक्षपदी बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष सुखदेव चिखलीकर राहणार आहेत. पूज्यनिय भदंत पय्यांबौधी थेरो यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एलसीबीचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, समाज कल्याण अधिकारी माळवदकर, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे, जात पडताळणी अधिकारी रविंद्र आवुलवाड, मनपा सहायक आयुक्त रावण सोनसळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष काटकांबळे, सेवानिवृत्त मनपा उपायुक्त प्रकाश येवले, मनपा पाणीपुरवठा अभियंता संघरत्न सोनसळे, मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे, ऍड. अमित डोईफोडे, वकिल संघाचे सचिव ऍड. नितीन कागणे, ऍड. गिरीष मोरे, अनिरुद्ध सिरसाट, डॉ.कपिल कुर्तडीकर, अशिष बियाणी, मनपाचे कर्मचारी नेते सुमेध बनसोडे, फुले-आंबेडकरी चळवळीतील नेते दिगंबर मोरे, सम्यक आंदोलनाचे प्रफुल्ल सावंत, फिनिक्स हॉस्पीटलचे संचालक डॉ. अनंत सूर्यवंशी, नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम, सुरेश हाटकर, रमेश गोडबोले, संविधान हक्क परिषदेचे भी. ना. गायकवाड, रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष धम्मा धुताडे, शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संघरत्न कांबळे, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सुषमा थोरात, भीमशक्तीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय कौठेकर, कराटे प्रशिक्षक विक्रांत खेडकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे अवाहन सुधाकर पांढरे मित्र मंडळाचे राहुल वाघमारे, प्रशांत पोपशेटवार, सुशांत जोंधळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.