बीटाच्या रसाचे फायदे-२

Read Time:10 Minute, 39 Second

बीटच्या नियमित सेवनाने अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. बीटची चव प्रत्येकाला आवडत नसल्यामुळे बीट सहज खाणे शक्य असत नाही. त्यासाठी बीटचा रस तयार करून त्यात थोडे काळे मीठ मिसळून चवदार रस सेवन करावा. बीटच्या रसाचे नियमित सेवन करते. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते कारणहा रस पिल्यामुळे शरीर पूर्णपणे निरोगी राहण्यास मदत होते. बीटचा रस हा ‘सुपर ज्यूस’ मानला जातो. बीटचा रस व्यायाम करणा-यांसाठी व्यायामानंतर एक उत्तम प्रकारचे पौष्टिक पेय समजले जाते कारण त्यामुळे क्रीडा प्रकारातील (धावपटू, मैदानी खेळ, शारीरिक कसरत) कामगिरी सुधारण्यास मदत होते. लाल ला दिसत असलेले बीटरूट ही एक निसर्गाची भेटवस्तू आहे. ज्याच्या सेवनाने आपण अनेक असामान्य रोगापासून मुक्त होऊ शकतो. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध असते परंतु हिवाळ्यात मिळणारे बीट हे अधिक चांगले व पौष्टिक मानले जाते.

प्राचीन काळापासून बीट या कंदाचा वापर अनेक आजारापासून बचाव करण्यासाठी केला जात आहे. प्रामुख्याने यामध्ये बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यात ताप याचा समावेश आहे. याशिवाय बीट हे लोक, जीवनसत्वे आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे बीटाचा आहारात समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते आणि रक्त शुद्धिकरण होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्यात असलेल्या अ‍ॅन्टी ऑक्सिडंटमुळे शरीराची रोगापासून प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

या व्यतिरिक्त बीटरूट सेवनाने रक्तदाब देखील नियमित राहतो. तसेच बीटच्या आहारातील समावेशामुळे दृष्टी सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत होते. म्हणूनच की काय डॉक्टर अथवा वैद्य आपल्या दैनंदिन आहारात बीटचा समावेश करण्याचा सल्ला देतात. उपयोग: बीट किंवा त्याचा रस सेवन केल्याने आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. १०० ग्रॅम बीटमध्ये ४२ कॅलरी आणि १०० मिली रसामध्ये ९५ कॅलरी ऊर्जा असते. त्यामुळे बीट थकवा दूर करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त बीटमध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हृदयाची व फुफ्फुसाची कार्यशक्ती वाढते कारण त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो व शरीराची दीर्घकाळ सक्रिय राहण्याची क्षमता वाढते. हृदय हा शरीराचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. जो निरोगी असणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी बीटरूटचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच यामध्ये असलेले नायट्रेट घटक रक्तदाब सामान्य करून हृदयविकारापासून बचाव करतात.

उच्च रक्तदाब ही गंभीर स्वरूपाची शारीरिक समस्या आहे. ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब सामान्यापेक्षा थोडा जास्त वाढतो त्यामुळे घातक परिणाम होतात. बीटरूटमध्ये नायट्रेट तत्व असतात. जे उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम करतात त्यामुळे ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी उकडलेल्या बिटाचा रस किंवा कच्च्या बीटचा २०० मिली रसाचे सेवन केल्यास रक्तदाब पातळी सुधारते. बीट लोहाने समृद्ध असलेले कंद आहे. लोह शरीरात लाल रक्तपेशी बनविण्यास मदत करते. लाल पेशीमुळे शरीराच्या विविध भागात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम केले जाते. त्यासाठी दररोज सकाळी एक कप बीटााच रस प्यायल्याने अ‍ॅनिमियापासून मुक्त होण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉल हा एकच चरबीसारखा पदार्थ असून हा शरीराला आवश्यक असलेला घटक आहे. यामध्ये एल.डी.एल. (हलका) हानीकारक असल्यामुळे याला वाईट कोलेस्टेरॉल म्हणतात. तर एच.डी.एल. (जड) कोलेस्टेरॉल हा वाईट कोलेस्टेरॉलला कमी करण्यास मदत करतो म्हणून याला चांगला कोलेस्टेरॉल म्हणतात. शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढल्यास रक्तवाहिन्यामध्ये जाम होऊन गंभीर नुकसान होऊ शकते व हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यासाठी दररोज १०० मिली बीटचा रस घेतल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रीत राहण्यास मदत होते.बीटरूटचा आहारातील वापर लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बीटरूट किंवा त्याच्या रसाचा वापराने लैंगिक कार्य हार्मोन्स वाढविण्यास मदत होते व त्यामुळे पुरुषामधील नपुसकता कमी होण्यास फायदा होाते. बीट नायट्रीक ऑक्साईड तयार करते ज्यामुळे रक्तवाहिन्याचा विस्तार होतो. बीटरूटमध्ये अनेक महत्त्वाची जीवनसत्वे आणि खनिजे विपूल प्रमाणात असतात. महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्व -क मुबलक असते जे डोळ्याखाली खूपच फायदेशीर आहे. ज्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जीवनसत्व क चा आहाराने मोतीबिंदूपासून संरक्षण मिळते.

बीटच्या सेवनाने फक्त हाडेच नाही तर दात देखील अधिक मजबूत होतात. बीट हे कॅल्शियम ने समृद्ध असलेले कंद आहे. त्यामुळेच हे आपल्या शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण करते. कॅल्शियम दातासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे त्यासाठी बीट दातांनी चाऊन खाल्ले पाहिजे अथवा ४० मिली रस पिला पाहिजे ज्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.
बीटमध्ये बसलेले बीटालेन हे एक प्रभावी अ‍ॅन्टीऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणा-या नुकसानीपासून बचाव करते.

आपल्या चेह-यावरील त्वचेमध्ये तैलगं्रथी असतात. त्वचेला स्रिग्धता येण्यासाठी त्यातून स्त्राव होतो. स्त्राव बाहेर पडताना अथवा निर्माण झाल्यास तिथल्या ग्रंथीला सूज येऊन पू होतो. त्याला आपण मुरुम अथवा पिंपल्स किवां तारुण्यपिटिका असे म्हणतो. साधारणत: १३ ते २६ या वयोगटात ही समस्या होते. बीटामध्ये अनेक अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात. जे पिंपल्सच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करतात.

बीटमध्ये अनेक पोषक घटक विपूल प्रमाणात असतात. त्यातही पोटॅशियम केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असलेला आहे. ज्यामुळे केस गळती थांबते व केसाचा वाढ सुद्धा व्यवस्थित होते. प्रामुख्याने लहान मुलींच्या डोक्यामध्ये उवा झाल्यावर त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी बीट अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी एक बीट चिरून एकलिटर पाण्यात चांगले उकळून व त्यानंतर गाळून थंड करावे. या थंड पाण्याने दररोज डोके धुतल्यास उवा कमी होण्यास मदत होते. शरीरातील विषकारक घटक शरीराबाहेर काढण्यासाठी बीट अत्यंत उपयुक्त आहे. बीटाचा रस नियमित सेवन केल्याने शरीरातील अतिरिकत मलनिस्सारण (अनावश्यक पदार्थ) होण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे शरीरातील घाण बाहेर काढण्याचे कार्य बीटाच्या रसामुळे होते.

सावधानता : बीट किंवा त्याच्या अति सेवनाने जुलाब होऊ शकातत. बीटच्या जास्ती सेवनाने तोंडाची चव जाऊ शकते. कमी रक्तदाब असलेल्यांनी बीटचे सेवन करू नये. मुतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी बीट खाणे टाळावे. सुरुवातीला बीट खाण्यामुळे किंवा रस पिल्यामुळे लघवी व संडासचा रंग लालसर दिसू शकतो त्यामुळे घाबरू नये.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 8 =