बिहारच्या कोर्टाचा एका दिवसात खटला निकाली काढून विक्रम

Read Time:1 Minute, 58 Second

पाटना : देशातील आजपर्यंतचा कोणत्याही पॉस्को न्यायालयाने दिलेला हा सर्वात जलद निकाल आहे, बिहारमधील अररिया पॉस्को न्यायालयाने साक्षीदार, युक्तिवाद आणि प्रतिवाद नोंदवून, आरोपीला दोषी ठरवून केवळ एका दिवसात निकाल जाहीर करून खटला पूर्ण केला आहे. हा खटला ४ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडला असला तरी ऑर्डर शीट उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी ही बाब उघडकीस आली.

या प्रकरणात विशेष न्यायाधीश (पॉस्को) शशीकांत राय यांच्या न्यायालयाने दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि ५०,००० रुपये दंड ठोठावला आहे. यातून पीडितेला ७ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हे प्रकरण यावर्षी २२ जुलै रोजी आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराशी संबंधित असून २३ जुलै रोजी एफआयआर दाखल करण्यात आली होती.

तसेच बिहार सरकारच्या गृह विभागाने दिलेल्या प्रेस नोट नुसार कदाचित एका दिवसाच्या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे. त्यापूर्वी, दतिया (मप्र) जिल्ह्यात, ८ ऑगस्ट २०१८ रोजी न्यायालयाने तीन दिवसांच्या खटल्यानंतर निकाल दिला होता. बिहारने आता एका दिवसात खटला चालवून दोषीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देऊन राष्ट्रीय विक्रम केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

one + twelve =