बिहारचे नवे मुख्यमंत्री नितीश कुमार तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

Read Time:2 Minute, 7 Second

पाटणा : बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले. यावेळी नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपला सोडचिठ्ठी देत नितीश कुमार यांनी महागठबंधनसोबत नवे सरकार स्थापन केले आहे. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला.

राजभवन येथील या शपथविधी सोहळ्याला लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्य तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव, माजी मुख्यमंत्री राबडीदेवी तसेच राजदचे नेते तेज प्रताप यादव हे देखील उपस्थित होते. दरम्यान, शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, भाजप सोडण्याचा निर्णय पक्षाने एकत्रितपणे घेतला. सन २०२४ पर्यंत पदावर राहिल किंवा नाही हे सांगू शकत नाही. त्यांना काय बोलायचे ते बोलू शकतात. पण मी सन २०१४ मध्येच अद्याप राहू शकत नाही. तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेजस्वी यादव म्हणाले, बिहार माझे कुटुंब आहे. मी सर्वांचे आभार मानते असे तेजस्वी यांच्या पत्नीने म्हटले तर बिहारसाठी ही चांगली गोष्ट घडली. मी सर्वांचे आभार मानते असे तेजस्वी यांच्या आई राबडी देवी यांनी म्हटले आहे. आम्ही काम करण्यासाठी सत्तेत आलो आहोत असे तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 2 =