बिलोलीचे कृषी अधिकारी पसलवाड लाच प्रकरणी चतुर्भुज

Read Time:2 Minute, 43 Second

बिलोली : बिलोली येथील तालुका कृषी अधिकारी रमेश लक्ष्मण पसलवाड हे एका शेतक-या कडून बारा हजार रूपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे अतिवृष्टी अशा संकटात हा प्रकार संताप जनक असून या बाबत संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.

येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी या पदावर रमेश पसलवाड एक वर्षा पासून कार्यरत आहेत.तक्रारदार नविन कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा कृषी अधिक्षक नांदेड यांच्याकडे शिफारस करून प्रस्ताव सादर करण्यासाठी गेल्या कांही दिवसा पासून तालुका कृषी कार्यालयाचे उंबरवठे झिझवत होते.पंरतु फाईल पुढे सरकेना शेवटी पंधरा हजार रूपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली तडजोडी अंती बारा हजारावर तडजोड झाली.असे असतांना हा अन्याय आहे असे तक्रारदारास वाटू लागल्याने तक्रारदार या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या अनुषंगाने सर्व बाबी तपासून सत्यता पटल्या नंतर एसीबी विभागाने सापळा रचून बारा हजार रुपयाची लाच स्विकारण्याचा प्रयत्न करीत असतांना पसलवाड एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.ही कार्यवाही या विभागाच्या पोलील अधिक्षक कल्पना बारवकर उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद हिंगोले पो.नि.पो.ना.एकनाथ गंगातिर्थ,जगन्नाथ अनंतवार,ईश्वर जाधव,नरेन्द्र बोडके यांनी कार्यवाही पार पाडली. कोणत्याही कामासाठी शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी लाच मागितलीतर तात्काळ लाचलूचपत विभागाशी नागरिकांनी संपर्क साधून लाच घेणा-या विरुद्ध तक्रार दाखल करावी असे आवाहन लाचलूचपत विभागाच्या वतीने करण्याता आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + nine =