बियाणी खून प्रकरणी आणखी दोन आरोपी जेरबंद

Read Time:1 Minute, 44 Second

नांदेड: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले होते. यात शनिवारी आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.

संजय बियाणी यांच्या खून प्रकरणात मागच्या चार दिवसांपासून आरोपींना ताब्यात घेण्याचे सत्र नांदेड पोलिसांकडून सुरू आहे. १ जून रोजी या प्रकरणाशी संबंधित सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर लगेच दुस-या दिवशी पंजाब येथून पोलिसांनी सातवा आरोपी पकडून आणला. यात आणखी शनिवारी भर पडली असून, तपासा दरम्यान गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने कृष्णा धोंडीबा पवार (वय २८, रा.आमदुरा ता.जि.नांंदेड) व हरीश मनोज बाहेती (वय २८, रा.मारवाड गल्ली, नांदेड) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या खून प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen + five =