बिज प्रक्रिया संच अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड – शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ / कंपनीने बँकेकडे प्रस्ताव सादर करावीत. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर शेतकरी उत्पादक संघ / कंपनी (एफपीओ/एफपीसी) अनुदानास पात्र राहतील. तालुका कृषि अधिकाऱ्याकडे 31 जुलै पर्यत अर्ज सादर करता येतील. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा एकदाच लाभ दिला जाणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

कृषि विभागाच्यावतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके सन 2024-25 मध्ये स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) साठी बीज प्रक्रिया संचचा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहून शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत प्रमाणित बियाणे उत्पादक करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांना बिज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी यंत्र सामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने कळविले आहे.

 


Post Views: 5


Share this article:
Previous Post: दोन जबरी चोऱ्या एक घरफोडी – VastavNEWSLive.com

June 26, 2024 - In Uncategorized

Next Post: सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान

June 26, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.