बाॅलिवूडवर शोककळा, सलमानच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मात्याचं निधन

मुंबई| बाॅलिवूडमधून(Bollywood) एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते नितिन मनमोहन(Nitin Manmohan) यांचं निधन झालं आहे. त्यामुळं बाॅलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
नितिन मनमोहन यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना बरेच दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांनी गुरूवारी अखेरचा श्वास घेतला.
मनमोहन यांनी सलमान खानच्या (Salman Khan) रेडी(Ready Film) चित्रपटाची निर्मिती केली होती. रेडी हा त्यांचा सगळ्यात सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. त्यांच्या जाण्यानंतर सोशल मीडियावरून अनेक बाॅलिवूड सेलेब्रेटींनी आणि नेटकऱ्यांनी त्यांना आदरांजली वाहली आहे.
दरम्यान, लाडला, बोल राधा बोल यांसरख्या अनेक चित्रपट त्यांचे हिट ठरले आहेत. नितीन हे अभिनेते मनमोहन यांचे सुपूत्र होते.
महत्वाच्या बातम्या-