बाळास वाचविण्यासाठी मातेची विहिरीत उडी

Read Time:1 Minute, 32 Second

चापोली : येथून जवळ असलेल्या नायगाव येथे दि २४ डिसेंबर रोजी एका मातेने तिच्या लहान मुलाला ३५ फूट विहिरीत उडी मारून वाचवले असून एका महिलेने एवढे मोठे धाडस केल्याबद्दल तिच्या धाडसाचे संपूर्ण नायगावसह तालुक्यातून कौतुक होत आहे.

चाकूर तालुक्यातील नायगाव येथील सौ. कल्पना हनुमंत बिडवे यांचा मुलगा अजिंक्य बिडवे हा आपल्या अंगणात खेळत असताना अंगणामध्ये असलेल्या विहिरीमध्ये तो पडला तो पडल्यानंतर त्यांच्या मातोश्री कल्पना हनमंत बिडवे यांनी ३५ फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये स्वत: उडी घेऊन त्या मुलाला वाचविलें. मुल आणि आई दोघेही सुखरूप आहेत केवळ आईला दुखापत झाली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. एका महिलेने तिच्या बाळाला वाचविण्यासाठी एवढे मोठे धाडस केल्याबद्दल नायगावचे सरपंच रमेश मोगले, उपसरपंच नीलेश देशमुख सह ग्रामस्थांनी त्या महिलेचा ग्रामस्थांच्यावतीने ग्राम पंचायत कार्यालयात सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

one − one =