“बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे”

Read Time:1 Minute, 44 Second


मुंबई | दसरा मेळावा शिवाजी पार्क होणार आहे. या दसरा मेळाव्याला (Dasara)कोण संबोधित करणार यावरून राजकीय घडामोडीला वेग आला आहे. आता यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(MNS Sandip Deshpnade) दसरा मेळावा कुठल्या दिवशी, कुठल्या जागेवर करता याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे संबोधित करणारी व्यक्ती काय संबोधित करते. जर आपण पूर्ण देशातली महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली आणि या सगळयात बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते पुढे घेऊन जायची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती राज ठाकरेंच्यामध्ये आहे, असं संदीप देशपांडे म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) हे राज ठाकरेंना भेटले होते. मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्याकडे मदत मागितली नाही, असं संदीप देशापांडे म्हणालेत.

आम्ही काय मदत करायचा विषय येत नाही. त्यांनी राज साहेबांनी विनंती केलेली आहे. ते निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

बुलढाण्यात मोठा राडा; शिवसेना-शिंदे गट आमनेसामने

‘अरे किती खोटं बोलतोस रे’; पुरूष बायको किंवा गर्लफ्रेंडला सांगतात ‘या’ गोष्टी खोट्या
Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

5 + 5 =