“बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर मिळालं”

Read Time:1 Minute, 39 Second



औरंगाबाद | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पैठण येथे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेला तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर मिळालं, असा टोला शिंदेंनी लगावला आहे.

ही सच्च्या शिवसैनिकांची गर्दी असल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. तर मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की स्वत:चंही ऐकत नाही, असं वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, पैठण येथील सभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर देखील टीका केली. तर एकनाथ शिंदे तुमच्या परिवारातील एक सदस्य आहे. तुमच्या हाकेला धावून येईन हा शब्द आहे, असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे नितीन गडकरी आणि अक्षय कुमार ट्रोल

सोनं खरेदी करण्याची सोनेरी संधी, सोन्याच्या दरात मोठी घसरण



Leave a Reply

Your email address will not be published.

4 × one =