“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”

Read Time:2 Minute, 12 Second


मुंबई | भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. अतुल भातखळकर यांनी खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील बोचरी टीका केलीये.

बाळासाहेब ठाकरेंचं नाव चालतं, बाकी सगळं चालतं मग त्यांचाच मुलगा आणि नातू यांना का चालत नाही?, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला होता.

जर तुम्हाला दुसरं घर करायचं असेल तर करा यासाठी तुम्हाला शुभेच्छाच आहेत. पण ठाकरे कुटुंबावर ज्या प्रकारे आरोप केले जात आहेत ते चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. याला अतुल भातखळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मुलगा अशासाठी चालत नाही कारण तो खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय, अशी घणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

FRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का

बाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण?, जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 + 17 =