May 19, 2022

बार्शीच्या मयूर फरतडे याला फेसबुककडून २२ लाखांचे बक्षिस

Read Time:4 Minute, 16 Second

बार्शी (विवेक गजशिव) : भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्रामकिंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? आज इंटरनेट आपल्या सर्वांच्या जीवनात एक महत्त्वाचा भाग झाला आहे, परंतु हे धोकादायक देखील सिद्ध होऊ शकते. जगाच्या कानाकोप-यात गुन्हेगार मनाचे हॅकर्स बसले आहेत जे तुमची वैयक्तिक माहिती रात्रंदिवस चोरी करण्याचा प्रयत्न करतात.ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअंिरग कॉलेज मध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचवले. त्याच्या या संशोधनाची दखल घेत फेसबुक ने त्याला 30 हजार डॉलर चे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठवला आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप आणि ट्विटर सारख्या र्ब­याच कंपन्या वापरकर्त्यांची सुरक्षा करण्यासाठी हॅकर्सपासून सतत त्यांच्या सिस्टीमचे रक्षण करतात, पण कुठेतरी ते चुकतही असतात. कंपनीच्या या चुकीमुळे वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. फेसबुकच्या कंपनी इन्स्टाग्राममध्ये मयूर फरताडे या मुलाला असाच एक बग सापडला, यासाठी त्याला 22 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

भारतीय विकासक मयूर फरताडे यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचवले. 21 वर्षीय मयूर फरताडे यांनी सांगितले की फेसबुकच्या प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राममध्ये एक गंभीर बग आहे, ज्याचे हॅकरने सांगितले तर लोकांचे बरेच नुकसान होऊ शकते.मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील रहिवासी असलेला मयूर हा संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे.तो शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. मधुकर फरताडे यांचा पुतण्या आहे. फेसबुकने मयूरला एक ई-मेल पाठविला असून त्यास बक्षीसबद्दल माहिती देण्यात आली.

लॉक डाऊन मध्ये पुरेसा मोकळा वेळ होता. काहीतरी नवीन शिकायचे म्हणूनवेगवेगळ्या स्विक्युरी रिसोसेर्सेच चे लिखाण वाचत होतो. त्यातूनच मला इन्स्टाग्रामवर बग शोधण्याचे प्रोत्साहन मिळाले. दोन आठवडे मी नवीन फीचर्स बघून वेब अ‍ॅप आणि अँड्रॉइड अ‍ॅप वर टेस्ट करत होतो. त्यात मला हा बग सापडला. फेसबुक चा बग bounty प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये त्यामध्ये सिक्युरिटी रिसर्चेस पार्टीसिपेट करू शकतात. ईथे जाऊन मी हा बग रिपोर्ट केला.
– मयूर फरताडे

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 2 =

Close