बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त


 

नांदेड- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.

 

या परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315,7387647902, 9011302997 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.


Post Views: 13


Share this article:
Previous Post: ..अन्यथा नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्यात येईल

May 22, 2024 - In Uncategorized

Next Post: नांदेड जिल्हयात गुन्हेगाराच्या टोळ्या करुन गुन्हे करणारे 70 इसम नांदेड जिल्हयातुन हद्दपार, 14 स्थानबध्द

May 22, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.