बामणीत मासे सकंलन केंद्रावर हल्ला, आठ जणांविरूध्द गुन्हा नोंद

Read Time:2 Minute, 53 Second

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील बामणी येथील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या बामणी येथील मासे संकलन केंद्रावर दि.०५ मे रोजी राञीच्या सुमारास आम्हाला कामावर का घेत नाहीत म्हणून बामणी येथील आठ जणांनी हल्ला करीत मासे संकलन केंद्रावरील सामानाची तोडफोड केली. तसेच येथील खाजगी कर्मचा-यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी संस्था अध्यक्ष सं.माबुद यांच्या फिर्यादीवरून ०८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अटक करण्यात आला आहे.

स्व.राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सह.संस्था मर्यादित येलदरी कार्यालय अंतर्गत बामणी येथे मासे संकलन केंद्र आहे. याच मासे संकलन केंद्रावर आम्हास कामावर का घेत नाहीत म्हणून गावातील गोविंद प्रभाकरराव देशमुख व राम उर्फ छकुला छबुराव जाधव यांच्यासह ०८ जणांनी ०४ दुचाकीवर रात्री १० वाजता येऊन अचानक हल्ला चढवला. हातातील लाठ्या काठ्यांनी संकलन केंद्राचे सुपरवायझर धर्मेंद्र कुमार चव्हाण, जगदीश सहाणे, मलिन सहाणे यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत.

तसेच शेख अबुसाद याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता शेख अबुसाद यास शिवीगाळ केली. मोहम्मद अरमान नसरुल्ला अहमद यांचे भांडणात पैश्याचे पॅकेट गोविंद देशमुख याने घेऊन गेला. जाताजाता या लोकांनी तुम अगर यहा पर रहें तो तूम्हे और इस शेड को पेट्रोल डालकर जला देंगे असे म्हणत तेथील खुर्च्या, टेबल, कॅमेरे व इतर वस्तूंची तोडफोड करून १० हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद संस्था अध्यक्ष सय्यद माबुद सय्यद महेबूब यांनी दिली. या तक्रारीवरून आरोपी गोविंद प्रभाकरराव देशमुख व राम उर्फ छकुला छबुराव देशमुख यांच्यासह ०८ जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × five =