बाचेगाव ता.धर्माबाद येथून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता


नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचेगाव ता.धर्माबाद येथून एक 19 वर्षीय विवाहिता 3 जुलैपासून गायब झाली आहे. या संदर्भाने धर्माबाद पोलीसांनी शोधपत्रिका जारी करून जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारी विवाहिता कोणास दिसल्यास त्यांनी त्यासंदर्भाची माहिती धर्माबाद पोलीसांना द्यावी.
अनुसयाबाई दिगंबर शिंदे रा.बाचेगाव यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात 5 रोजी अर्ज दिला की, त्यांची मुलगी अरुणाबाई श्रीकांत शितोळे (19) ही 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उमरी येथे जाऊन शिवायला दिलेले कपडे घेवून येते म्हणून घरातून निघून गेली. ती परत आलीच नाही. अरुणा शितोळेचा आसपास आणि नातलगांकडे शोध घेतल्यानंतर अर्ज दिला आहे.
पोलीसांनी या संदर्भाने प्रसिध्दी पत्रक पाठवून प्रसार माध्यमांना या बातमीला प्रसिध्दी देण्याची विनंती केली आहे. गायब झालेल्या विवाहितेसंदर्भाने धर्माबाद पोलीसांनी मिसिंग क्रमांक 29/2024 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक एस.ए.आडे यांच्याकडे या अर्जाचा तपास देण्यात आला आहे. गायब झालेल्याा विवाहितेचे वय 19 वर्ष आहे. रंग गोरा आहे. उंची 5 फुट आहे. बांधा मजबुत आहे. तिचे केस काळे आणि लांब आहेत. घरातून जातांना तिने काळे व चॉकलेटी रंगाचे टॉप असे कपडे परिधान केलेले आहेत. तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. या संदर्भाने वर्णनात सांगलेली विवाहिता किंवा फोटोत दिसलेली विवाहिता जनतेतील कोणास दिसली तर ही माहिती पोलीस ठाणे धर्माबाद पोलीस ठाण्यात द्यावे जेणेकरून या बपेत्ता महिलाचा शोध लागेल. पोलीस उपनिरिक्षक सुदाम आडे यांचा मोबाईल क्रमंाक 9923692588 यावर सुध्दा माहिती देता येईल.


Share this article:
Previous Post: नांदेड येथील संपादक कृष्णा शेवडीकर यांनी शासनाला लावला चुना-विनोद पत्रे

July 6, 2024 - In Uncategorized

Next Post: केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांची बदली पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभ संपन्न 

July 6, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.