बागेश्वर महाराज एका प्रवचनासाठी घेतात ‘इतके’ रूपये

Advertisements
Advertisements
Read Time:4 Minute, 36 Second


मुंबई | दरबारात आलेल्या भाविकांचे आपल्या दिव्यशक्तीनं आपोआप नाव ओळखणारे, एवढंच नाही तर त्या भाविकांचे वडिलांचे नाव, फोन नंबर हे सगळंही अचूक ओळखणारे बागेश्वर धाम सरकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. आता याहून आश्चर्यकारक बाब म्हणजे हे बागेश्वर महाराज भाविकांच्या घरात कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवलीय हेही सांगतात. त्यामुळं काहींनी त्यांच्या चमत्काराला दैवीशक्ती म्हणत त्यांना डोक्यावर घेतलय तर काहींनी याला अंधश्रद्धा म्हणत विरोध केलाय. आता या सगळ्यात बागेश्वर महराजांच्या संपत्तीचा मुद्दाही चर्चेत येतोय, त्यामुळं हे बागेश्वर धाम सरकार एका प्रवचनासाठी नेमके किती रूपये घेतात. त्यांची महिन्याची कमाई किती होते आणि त्यांची नेटवर्थ किती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा. नमस्कार मी निकिता पाटील आणि थोडक्यातमध्ये आपलं स्वागत

Advertisements

बागेश्वर महाराज यांची संपत्ती जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. बागेश्वर धाम यांचं मूळ नाव धीरेंद्र शास्री असं आहे. त्यांचा जन्म मध्यप्रदेशीमधील छतपूरजवळील गडागंज या गावात झाला आहे. याच गडागंजमध्ये बागेश्वर धाम मंदिर आहे. या बागेश्वर दरबाराता मोठ्या संख्येने भाविक समस्या घेऊन जातात आणि बागेश्वर धाम या समस्येंचं निराकरणही करतात.

नुकतंच ते नागपूरमध्येही आले होते. यावेळी बागेश्वर महाराजांनी नागपूरच्या व्यासपीठावर चमत्कार दाखवावा, असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं होतं. जर बागेश्वर महराजांनी या व्यासपीठावर चमत्कार दाखवला तर त्यांना ३० लाखांचं बक्षिसही देण्यात येणार होतं. परंतु हे महाराज आव्हान न स्विकारता निघून गेले आणि ज्यांना चमत्कार बघायचाय त्यांनी बागेश्वर दरबारात यावं असं त्यांनी सांगितलं. बागेश्वर धाम सरकार हे तेथून घाबरून निघून गेले असे काहींचं मत आहे.

हे बागेश्वर महाराज महाराष्ट्रातून निघून गेले खरे पण सध्या त्यांच्या छत्तीसगडमधील रायपूरमध्ये सुरू असलेल्या प्रवचनाला भाविकांनी तूफान गर्दी केलीय. एकंदरीत, बागेश्वर महाराज अंधश्रद्धा पसरवत आहेत असं म्हणत त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या कमी नाही तर दुसरीकडं त्यांच्याकडं असणाऱ्या दिव्यशक्तीला सलाम करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

आता या सगळ्यात बागेश्वर महाराजांच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा होताना दिसतेय. धीरेंद्र शास्त्री एका प्रवचनासाठी ८ हजार रूपये घेतात. या महारजांची एका महिन्याची कमाई तब्बल साडेतीन लाख रूपये आहे. तर त्यांची नेटवर्थ 9 कोटी रूपये आहे. बागेश्वर धाम महाराज यांची संपत्ती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसत आहे.

पण बागेश्वर महाराजांनी या संपत्तीचा उपयोग समाजकार्यसाठी केला जातोय असं सागितलंय. ते या पैशांचा उपयोग भूकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी तसेच गरजूसांठी करतात. आपण एक गोशाळा देखील चालवतो अशी माहिती बागेश्वर महाराजांनी दिलीय.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close

अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण

[ad_1] मुबंई | 1969 साली ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून अभिनेत्री रेखाने (Rekha) चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आज 66 व्या वर्षीदेखील रेखा तितकीच सुंदर आहे. आजही अनेक अभिनेत्री रेखाच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात. रेखाच्या काळातील लोकच नव्हे तर प्रचंड तरुण वर्गदेखील रेखाचा चाहता आहे. बाॅलिवूडपासून (Bollywood) रेखा सध्या दूर आहे. रेखा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या आणि अमिताभ बच्चन (Amitabh...

भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपने (Bjp) तयारी सुरू केली आहे. भाजप 2024 मध्येही यश मिळेल आणि मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. मात्र भाजपसाठी ही निवडणूक इतकी सोप्पी नसेल असं आता दिसतंय. भाजपला टक्कर...

ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?

[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी राहतो. प्रेमाचा शेवट होतो तो ब्रेकअपनी(break up). अनेकदा यातून लोक बाहेर पडतात. खूप लोकं यातून लवकर बाहेर पडतात. काहीनां मात्र हे लवकर जमत नाही. त्या आठवणी, त्या व्यक्तीची आठवण नेहमीच त्रास देते. मुली-मुलं दोघांसाठीदेखील ब्रेकअप पचवणं अवघड असतं. याचा परिणाम...

चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण

[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी घातलेल्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. या जॅकेटनं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मोदीचं हे जॅकेट अगदी वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आहे. मोदी नेहमीच त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत येत असतात. मोदींनी घातलेलं हे जॅकेट साध्या कापडाचं...

‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज

[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानचाही(Saif Ali Khan) मोठा चाहतावर्ग आहे. सैफ-करीनानं 2012 मध्ये लग्नगाठ बांधली आणि सध्या त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. परंतु लग्नापूर्वी करीनानं तब्बल ३ वेळा सैफचं प्रपोज नाकारलं होतं. तर झालं असं होतं की, त्याकाळात करीना आणि शाहरूखचं ब्रेकअप...