“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”

Read Time:2 Minute, 3 Second


मुंबई | शिवसेना (Shivsena) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि एकूणच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु आहे. बहुमताचा उल्लेख करत शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांचा न्यायालयात युक्तिवाद सुरूये.

घटनात्मक संस्था असल्याने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्यावतीने कौल यांनी केला आहे. विधीमंडळ आणि राजकीय बहुमत विचार घेण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कौल यांच्या वतीनेही सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला जात आहे.

घटनापीठाने यावेळी या सदस्यांना पक्षातून काढून टाकल्याचं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंच्या वकिलांना केली. यावर कपिल सिब्बल यांनी पक्ष नाही तर पदावरुन हटवण्यात आलं असल्याचं सांगितलं.

दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी अल्पसंख्यांक असणाऱ्या शिवसेनेतील आमदारांनी एक बैठक घेत शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं आणि प्रतोद निवडले. त्यांच्याकडे बहुमत नसल्याने ते हे करु शकत नव्हते असा युक्तिवाद त्यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

न्यायालयातील सुनावणीपूर्वीच उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढलं; ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

“…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × one =