August 19, 2022

बळीरामपूर भागात एकाचा खून

Read Time:2 Minute, 9 Second

नांदेड : जिल्ह्यात खूनाचे सत्र सुरूच असून दिवसाआड एक खून होत आहेत. मागच्या चार दिवसात तीसरी खूनाची घटना घडली असून, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून तर दोघे गंभीर झाल्याची घटना दि. ४ मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणाची ग्रामीण पोलिस ठाण्यात खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, नवीन नांदेड भागातील बळीरामपूर या भागात असलेल्या सुनीलनगर, बकीट कारखान्याजवळ दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शेख फारूख शेख अमीन साब आणि त्यांच्या कुटूंबियांवर मारेकरी अब्दुल सत्तार, अब्दुल मुख्तार, सोहेल व इतरांनी हल्ला केला. सदर हल्ला जुन्या वादातून झाल्याचे सांगण्यात आले. आरोपीनी आपल्याकडील धारधार शस्त्रांनी वार करून शेख फारूख शेख अमीन साब यास गंभीर जखमी केले ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

सोबतच त्यांचे दोन बंधू शेख रमजान आणि शेख युनूस हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर रूग्णांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अब्दुल सयद वय ४६, मुख्तार अब्दुर खादर सयद वय २७, सयद सोहेल खादर वय ३२ रा. सर्व हिम्मतपुर बळीरामपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − eight =

Close