January 19, 2022

बळीरामपूरच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजुर

Read Time:3 Minute, 54 Second

नांदेड: नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथिल लोकनियुक्त सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.या अविश्वास ठरावासाठी गुरूवारी पोलिस बंदोबस्तात मतदान घेण्यात आले. सायंकाळी उशीरा मतमोजणी पुर्ण झाली असून सरपंचावरील अविश्वास ठराव १०११ मतांनी मंजुर झाला. एखादी मोठी निवडणूक असावी या पद्धतीन बळीरामपुर येथे तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

बळीरामपुर ग्रापंचायमध्ये लोकनियुक्त सरपंचाची निवड झाली होती.परंतू ग्रामपंचायतीत सतत होत असलेल्या गैरप्रकारमुळे ग्रामपंचायतच्या सदस्यांकडून लोकनियुक्त सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधात तहसिलदार यांच्याकडे अविश्वास ठरावासाठी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दहा दिवसापूर्वी सदस्यांचे मतदान घेण्यात आले. त्यात सवार्नुमते लोकनियुक्त सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधात अविश्वास ठराव तहसिलदार किरण अंबेकर यांच्या उपस्थितीत पारीत करण्यात आला.

या ठरावामुळे सरपंचाविरूद्ध काय निर्णय लागतो याकडे संपुर्ण नांदेड तालुक्याचे लक्ष लागले होते.यानंतर दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी निवडणूकीसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. निवडणूक विभागाच्या कर्मचा-यांनी आपल्या तयारीनूसार कामकाज सुरू केले.यात मतदानाला जवळपास दोन हजार मतदारांनी नोंदणी केली होती. सायंकाळी ४ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास मतदान प्रक्रिया पुर्ण झाली.यानंतर मतमोजणी सुरू करण्यात आली.यात सरपंचाच्या बाजूने ८४० तर विरोधात १०११ मते पडली.यामुळे सरपंच अमोल गोडबोले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजुर करण्यात आला.

निवडणुक प्रक्रियेत नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार पाटे, कुलकर्णी,चव्हाण यांच्यासह ग्रामविकास अधिकारी आर. एस हटकर यांनी सहभाग घेतला. तर एखादी मोठी निवडणूक असावी या प्रमाणे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.मतदान दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरंबाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यामुळे बळीरामपुला छावणीचे स्वरूप आले होते.

संरपचांचा विरुद्ध १०११ मते विरोधात
एकुण १९८४ मतदाना पैकी लोकनियुक्त संरपचांचा विरुद्ध १०११ तर व समर्थनार्थ ८४० मतदान झाले. तर १३३ मते झाले.८ मतदान केंद्रावर हे मतदान झाले. निवडणुक प्रकियेसाठी महसूल विभागाचे ९० तर पोलीस प्रशासनाचे जवळपास १२५ कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 10 =

Close