
‘बलोच’चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणा-या ‘बलोच’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून यात प्रवीण विठ्ठल तरडे यांची मुख्य भूमिका आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची कथाही प्रकाश जनार्दन पवार यांचीच आहे.
प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टिझर पोस्टरमध्ये पिळदार मिशा, करारी मुद्रा, डोळ्यात धगधगती आग असलेले प्रवीण तरडे दिसत आहेत. त्यांचा हा रांगडा अवतार सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवणारा आहे. जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माता महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
More Stories
एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.
नांदेड - माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस...
बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान
नविन नांदेड - सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान...
कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन
बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा...
श्रीलंकेत १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल
आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केले देशाला संबोधित कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली...
एकवेळ रुग्णवाहिकेचे भोंगे वाजत होते, आता तर वेगळेच वाजताहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला मुंबई : कोरोना काळात राज्यात मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद होती. त्यावेळी रुग्णवाहिकांचे भोंगे...
तामसा येथे भर दिवसा घर फोडी; साडेचार लाखाचा ऐवज लंपास
तामसा : तामसा येथील दिवसा चो-यांचे सत्र चालूच असून सोमवारी अज्ञात चोरट्यांनी व्यापाराचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास...