June 29, 2022

बनावट फेसबुक खात्या आधारे पैसे उखळणारे ठकसेन सक्रीय

Read Time:3 Minute, 47 Second

माहूर : प्रतिनिधी

कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या विषाणूने आता सर्वांची झोप उडविली आहे.मात्र याची गंभीरतेने दखल घेत जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला हिमायतनगर तालुक्यातील टेभूर्णीकरांनी प्रतिसाद देत गावात शंभर टक्के लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे.एवढेच नव्हे तर लस न घेता गावात प्रवेश करणा-यांना नो एन्ट्री केली आहे. यामुळे हे गाव सध्या चर्चेत आले आहे.

माहुर : प्रतिनिधी
संगणकीय तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही ठकबाज सर्वसामान्यांना लाखो रूपयांचा गंडा घालत आहेत.एटीएम कार्ड व्हेरीफिकेशन करायचे आहे. एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, लॉटरी किंवा बक्षिसे लागली अशी नानाविध आमिषे दाखवून अनेकांना गंडविण्याचा गोरखधंदा सध्या माहुर तालुक्यात तेजीत सुरू आहे.

सध्या अनेक नागरिकांना फोन येत असून बँकेतून बोलतोय असे सांगून ए.टी.एमचा कोड किंवा पीन मागणारे, व्हॉट्‌सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवणूक करणारे सायबर चोर आता फेसबुकचाही वापर करित आहेत. त्यात एक बेसबुक हॅनी चॅटचा हि समावेश आहे. माहुर तालुक्यातील वाई बाजार येथील आकाश सातव याच्या नावाची बनावट खाते तयार करून मैञी संदेश व इतर अनेक प्रकारचे संदेश टाकून फेसबुक मिञाला फसवणूक करण्यात आली.सदर प्रकरण त्याच्या लक्षात आल्याने त्याने एका मिञाच्या साह्यायाने फेसबुक खाते दुरुस्त करुण घेतल्याने अनर्थ टळला.

माहुर तहसील येथील मुद्राक विक्रते किशोर पवार यांच्या नावाची बनावट फेसबुक खाते तयार करून काहीजणांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला. त्यातील काही फेसबुक मिञांनी थेट पवार यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्याने हे प्रकरण लवकर उघडकीस आले आणि त्यांनी तत्काळ सिंदखेड पोलिस ठाण्यात तक्रार केली.अशीच बनावट फेसबुक खाती उघडून महामानवाची बदनामी करणे,जातीवाचक शिवीगाळ करणे,राजकिय व प्रशासकिय अधिका‍-यांना तसेच पञकारावर चिखलफेक करुन त्यांची बदनामी करण्याच्या घटना सतत घडत आहेत. आता सायबर चोरांची नजर माहुर तालुक्यातील बड्या उद्योजकांच्या रकमेवर पडल्याचे दिसून येत आहे. शिवाय फसवणुकीसाठी फेसबुकचा वापर हा सुद्धा नवीन पॅटर्न आहे,त्यामुळे आता फेसबुक वापरणा-यांनी सावधानता बाळगणे गरज निर्माण झाली आहे. शिवाय फसवणुकीसाठी फेसबुकचा वापर हा सुद्धा नवीन पॅटर्न आहे,त्यामुळे आता फेसबुक वापरणा-यांनी ही सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five + 8 =

Close