बनायचं होतं शिक्षिका पण बनली 796 कोटींची मालकीण… वाचा Isha Ambani ची फिल्मी स्टोरी

Read Time:4 Minute, 7 Second

नवी दिल्ली | रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे भारतातीलच नाही तर जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. अंबानी कुटुंबीयांची जीवनशैली त्यांचं राहणीमान हा अनेक लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे. स्वत: मुकेश अंबानी यांचं राहणीमान आणि जीवनशैली ही अत्यंत साधी आहे. मात्र असं असलं तरी त्यांची पत्नी नीता अंबानी आणि मुलांचं राहणीमान हे Lavish आणि Luxurious आहे.

गर्भश्रीमंतांची मुलं जास्त शिकत नाहीत असं आपण नेहमीच ऐकतो पण याला मुकेश अंबानींची मुलं अपवाद ठरली आहेत. त्यांची मुलगी Isha Ambani हीच्याबद्दल एक रंजक माहिती आज आम्ही तुम्हाला सागणार आहोत. इशा अंबानी हीचं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी या शाळेत झालं. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेला गेली. तिने मानसशास्त्र (Psycology) या विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर Stanford University मधून MBA चं शिक्षण घेतलंय.

मुकेश अंबानींनी त्यांच्या मुलीला म्हणजेच इशा अंबानीला Reliance Retail Venture ची डायरेक्टर बनवलं आहे. या कंपनीची Market Value 4.40 लाख करोड रुपये इतकी आहे. मुकेश अंबानींच्या या घोषणेनंतर इशा अंबानी अधिक चर्चेत आहे. इशा अंबानी जवळजवळ 796 करोड रूपयांची मालकीन झाली आहे. आज जरी ती करोडोंची मालकीन असेल तरी तिचं यापूर्वी शिक्षिका बनण्याचं स्वप्न होत. ती Stanford University मध्ये शिकत असताना तिथल्या लहान मुलांना देखील शिकवायची.

Reliance Jio लॉन्च करण्याची कल्पनाही इशाचीच होती असं स्वत: मुकेश अंबानींनी एका मुलाखतीत सांगितलेलं. 2016 साली इशाने AJIO हा मल्टीब्रॅंड अॅप लाँच केला. इशाने Reliance Art Foundation ची देखील स्थापना केली आहे. Reliance Foundation च्या Reliance Digital Program चे श्रेयदेखील इशालाच जातं.

2018 मध्ये इशा अंबानीचं लग्न झालं. Piramal Group सर्वेसर्वा अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकली. 2018 मध्ये झालेलं हे लग्न हे जगातील आत्तापर्यंतच्या लग्नांपैकी सर्वात महागडं लग्न म्हणलं जेतं. तिच्या लग्नात 700 करोड रुपये इतका खर्च करण्यात आला होता. लग्नामध्ये इशाच्या सासरच्या मंडळींनी जवळजवळ 450 करोड रूपयांचा बंगला गिफ्ट दिला होता. या बंगल्याचं नाव “गुलिता” असं आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या Reliance Industries च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानींनी आपले वारसदार घोषित केले. आकाश, इशा, अनंत या तिन्ही मुलांकडे त्यांनी आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाश अंबानींकडे जिओची जबाबदारी देण्यात आली आहे. तर इशा अंबानीकडे Reliance Retail ची आणि अनंत अंबानीकडे उर्जा व्यवसाय देण्यात आला आहे.

ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, किराणा माल, खाद्यपदार्थ, कपडे, ज्वेलरी, फॅशन, पादत्राणे यांचे वितरण तसेच Jio Mart ची जबाबदारी इशा अंबानी पार पाडत आहेत
Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

three × one =