बकरी ईद सण शांततेत साजरी करण्याचे आवाहन – VastavNEWSLive.com


· शांतता समितीची बैठक संपन्न

नांदेड – बकरी ईद सणानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी जिल्ह्यात व शहरात बकरी ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी, यासाठी सर्वानी नियमाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सर्व विभागाना सूचना केल्या.

आज जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मंथन हॉल येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि शांतता समितीचे सदस्य व सर्व संबंधित विभागप्रमुख आदीची उपस्थिती होती.


Post Views: 24


Share this article:
Previous Post: ऍड.प्रकाश आंबेडकरांनी मला पाठींबा दिला नाही याची खंत-खा.वर्षा गायकवाड

June 15, 2024 - In Uncategorized

Next Post: युवाशक्ती करीअर शिबिराच्या माध्यमातून ;युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध

June 16, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.