August 9, 2022

बंदेल यांच्या पाठपुराव्याला यश…

Read Time:3 Minute, 13 Second

नांदेड, दि.४ : नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे यांनी जातीने लक्ष घालून अजय बंदेल यांच्या प्रलंबित विषय मार्गी लावला. बंदेल यांच्या पाठपुराव्याला मनपाकडून यश प्राप्त झाले आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून नांदेड वाघाळा महानगर पालिका हद्दीतील विष्णूनगर भागातील सर्वे
नंबर ६६पैकी सिटी सर्व्हे नंबर ११०२९ व ११०३७ अन्वय शीट क्र.१२३ व १२४ मधिल दर्शविल्याप्रमाणे मोकळ्या रस्त्यावर अनाधिकृत तथा अतिक्रमित बांधकामे चालू व होत असून, या प्रकरणी सामाजिक कार्यकरते अजयकुमार बंदेल यांनी मनपाला पूर्ण पुराव्या सहित लेखी तक्रार केली होती. तरी देखील मनपाकडून यावर कुठलीही कार्यवाही करण्यात येत नव्हती म्हणून
बंदेल यांनी दि. १-५-२०२१ महाराष्ट्रदिनी रोजी आमरण उपोषणास बसले होते. त्या दिवशी मनपा
कडून बंदेल यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते की प्रस्तुत ठिकाणी, नांदेड मनपाद्वारे उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेण्यात येईल, त्या ठिकाणी जर अतिक्रमण घर विकणे पाठपुराव्याला मनपाकडून यश निघाल्यास अतिक्रमण काढण्यात येईल, असे की पत्रात नमूद केला होता, असे असतांना देखील त्या ठिकाणी बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू होते. या दरम्यान मनपाकडून संबंधित बांधकाम धारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम अंतर्गत ५३/ ५४ ची नोटीसही बजावण्यात आली होती. तरी देखील संबंधित धारक काम चालू ठेवल्यामुळे नांदेड मनपाकडून त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा
दाखल करण्यात आला होता. तरी सुद्धा तो बांधकाम पूर्ण करून एका प्रकारे नांदेड मनपास आवाहन केल्यासारखे झाले होते.

एवढे मोठे पराक्रम मनपाच्या समोर होत असताना मनपा गप्प होती, पण एकीकडे अजय बंदेल हे एक जागरूक नागरिक पप्रमाणे मनपा सोबत पाठपुरावा चालू ठेवला. शेवटी मनपा सुद्धा आपल्या दिलेल्या लेखी आश्वासनची पूर्तता करत उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय नांदेड यांच्यातर्फे त्या जागेची मोजणी करून घेणार आहे. त्याकरिता लागणारे पाहिजेत शुल्कसुद्धा मनपा भरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 2 =

Close