बंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी होणार

Read Time:1 Minute, 0 Second

मुंबई : बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची कारवाई सुरू झाली असली तरी बंडखोर मंत्री अजूनही पदावर कसे, असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत बोलताना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी येत्या २४ तासात बंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी होईल, असे सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदारांनी बंड पुकारले. यात अनेक मंत्रीही आहेत. परंतु बंडखोर मंत्री अजूनही मंत्रिमंडळात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून एकेक पावले टाकली जात असल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen + six =