बंगालच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान

पश्चिम बंगाल निवडणुकीवर गृह मंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शाह म्हणाले, आपण बंगालच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान करतो. भाजपला दिलेल्या समर्थनाबद्दल जनतेप्रती आभार व्यक्त करतो. अमित शाह म्हणाले, भाजप एका शक्तीशाली विरोधीपक्षाच्या स्वरुपात बंगालमधील जनतेचे अधिकार आणि राज्याच्या प्रगतीसाठी नेहमीच आवाज उचलत राहील. भाजप बंगालच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी २१६ जागांवर तर भाजप ७५ आघाडीवर आहे. ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का आहे. पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद झोकून दिली होती. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात वादळी प्रचार केला होता. मात्र, अखेर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

ममता बॅनर्जी आता सलग तिस-यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण २०० हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता. मात्र, त्यांना दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + six =

vip porn full hard cum old indain sex hot