बँकिंग घोटाळ्यांमुळे दररोज १०० कोटींचे नुकसान

Read Time:3 Minute, 4 Second

मुंबई : गेल्या सात वर्षात भारतात झालेल्या बँक घोटाळ्यांचे मोठे आणि गंभीर परिणाम भारताला सध्या भोगावे लागत आहेत. भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(आरबीआय) याबाबत माहिती दिली आहे. या घोटाळ्यांमुळे भारताचे दररोज १०० कोटींचे नुकसान होत आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआयकडील डेटाच्या माहितीनुसार, या बँक घोटाळ्यांमधील एकूण रक्कमेमध्ये दर वर्षाला घट होत असली तरी भारताच्या तिजोरीचे दररोज १०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र या यादीत अव्वल स्थानावर आहे. जिथे घोटाळ्यातील ५० टक्के पैशाचा समावेश आहे. त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये मिळून सुमारे २ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे बँक घोटाळे झाले आहेत. एकूणच ८३ टक्के पैसा हा या आर्थिक घोटाळ्यांमध्ये आहे. या सर्व राज्यांमध्ये मिळून १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात २.५ लाख कोटी रुपयांचे बँंिकग घोटाळे समोर आले आहेत. पण, अर्थ मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, बँकिंग घोटाळ्यांसंदर्भात त्वरित अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दरवर्षी फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

घोटाळ्यांची ८ प्रकारांत विभागणी
आरबीआयने या बँक घोटाळ्यांची आठ विविध प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये गैरवापर आणि गुन्हेगारी विश्वासाचे उल्लंघन, बनावट साधनांद्वारे फसवे रोखीकरण, हिशोबाच्या पुस्तकांमध्ये फेरफार किंवा काल्पनिक खात्यांद्वारे मालमत्तेचे रूपांतरण, बक्षीस किंवा बेकायदेशीर तृप्तीसाठी वाढवलेली अनधिकृत क्रेडिट सुविधा, निष्काळजीपणा आणि रोख कमतरता, फसवणूक आणि फसवणूक, परकीय चलन व्यवहारातील अनियमितता आणि इतर कोणत्याही प्रकारची फसवणूक (वरीलप्रमाणे विशिष्ट शीर्षकाखाली येत नाही) या प्रत्येक श्रेणी अंतर्गत घोटाळ्यांची माहिती यापूर्वी सहज उपलब्ध होत नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 + eighteen =