बँकांचा संप पुढे ढकलला

Read Time:1 Minute, 43 Second

मुंबई : बँकांच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ, कर्मचारी आणि कामगार संघटनांनी फेब्रुवारी महिन्यात दोन दिवसांचा संप जाहीर केला होता, सेंट्रल ट्रेड युनियन आणि इतर संघटनांनी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी बँक संपाची घोषणा केली होती, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हा संप आता पुढील महिन्यात मार्चमध्ये होणार आहे. बँकांनी २३ आणि २४ फेब्रुवारीला हा संप पुकारण्यात आला होता. मात्र आता हा संप आता २८ आणि २९ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या संपात देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या केंद्रीय समितीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी बँक संघटनांनी गेल्या महिन्यात १६ आणि १७ डिसेंबर रोजी संप केला होता. त्यानंतर बँक संपाचा परिणाम एसबीआय, पीएनबी, सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर झाला. चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर, डेबिट कार्ड यासंबंधीचे कामही रखडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen + sixteen =