July 1, 2022

फ्रुट बिअरच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

Read Time:5 Minute, 30 Second

सोलापूर :
शहरात विषारी केमीकलयुक्त ताडीमुळे अनेकांचे जीव गेले. पूर्व भागातील कामगार वर्गात केमिकल युक्त ताडी पिणा-यांची मोठी संख्या होती. त्यामुळे अनेकांचे जीव गेले. शहरात ताडीवर बंदी आली. पण आता फु्रट बिअरच्या नावाखाली पुन्हा एकदा हानीकारक पदार्थ मिसळून त्याची राजेरोस विक्री केली जाते. अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत फु्रट बिअरमध्ये इष्ट व कोलिफॉर्म सारखे मानवी शरीरास घातक पदार्थ आढळले असून ही बिअर स्वस्तात नशा येण्यासाठी विकली जात असून प्रामुख्याने कष्टकरी वर्ग या बिअरचा ग्राहक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने पूर्व भागात फु्रट बिअरचे लेबल लावून अशुध्द पाणी, शरीरासाठी घातक पदार्थ त्यात मिसळून ही बिअर बनविली जात आहे. स्वस्तात मिळत असल्याने कामगारवर्ग या नशेच्या आहारी जात आहे.

शहर आणि परिसरात अवघ्या ३० रूपयांमध्ये ही फु्रट बिअर विक्री केली जाते. इष्ट या नशेच्या पदार्थास बंदी असतानाही त्याचा वापर या बिअरमध्ये केला जातो. ड्रेनेजच्या पाण्यात व मानवाच्या विष्ठेत आढळणारा कॉलिफॉर्म हा घटक त्यात आढळला आहे. हे दोन्ही घटक शरीरासाठी घातक असून त्याचा अतिरिेक झाल्यास जिवितहानी होउ शकते. ही फु्रट बिअर राजरोस विक्री केली जात असताना अन्न व औषध प्रशासनाने धाडी घातल्यावर पोलिस खात्यास जाग आली. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरात फु्रट बिअर विक्रेत्यावर छापेमारी करून गुन्हे दाखल केले. मात्र ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत या अवैध फु्रट बिअरची विक्री होत होती त्या पोलिस कर्मचा-यांना याची माहिती नव्हती का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

दुसरीकडे ज्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचे अधिकार आहेत तो विभाग अदयाप झोपलेलाच असून राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध फु्रट बिअर विक्रीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. वास्तविक पाहता राज्य उत्पादक शुल्क विभागाचे भरारी पथक व गुन्हे अन्वेषण विभागाने या अवैध फु्रट बिअर विक्रीवर कारवाई करण्याची गरज असताना पोलिस व अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाया केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कमी मनुष्य बळाचे कारण सांगत निष्क्रीय रहात असून या विभागाचे अवैध दारूविक्रीकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याने सरकारचा महसूल बुडत आहे. ग्रामीण भागात हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्याचे काम पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पुढाकार घेउन कारवाई करताना दिसत नाही. वास्तविक पाहता राज्य उत्पादन शुल्क विभागाची निर्मितीच अवैध दारू विक्रीला लगाम घालण्यासाठी झाली असताना या विभागाचा कारभार निष्क्रीय असल्याचे दिसून येत आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालिन अधिक्षक सागर धोमकर यांची नक्षत्र वाईन्स प्रकरणी बदली झाली होती व अन्य कर्मचा-यांवरही कारवाई झाली होती. त्यानंतर आलेल्या आवळे यांचा कारभारही फारसा समाधानकारक नव्हता. सध्याचे विदयमान अधिक्षक नितीन धार्मीक यांनाही आपला ठसा उमटवता येत नसल्याचे दिसून येत आहे. फु्रट बिअरची विक्री शहरात सर्वत्र होत असल्याचे एमआयडीसी व सदर बझार पोलिसांनी शहराच्या विविध परिसरात केलेल्या कारवाईवरून दिसून आले आहे.
घोंगडे वस्तीत रसायनमिश्रिम फु्रट बियरच्या कारखान्यावर जोडभावी पेठ पोलिसांनी कारवाई करत बिअर बनवण्याचे साहित्य जप्त करत एका व्यक्तीला अटक केली आहे. अवैध फु्रट बिअरचा गोरखधंदा चालवणा-यांचे रॅकेट उध्वस्त करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + 7 =

Close